बी-बियाणे विभाग

शाश्वत समृद्ध शेतीसाठी नाविन्यपूर्ण पाऊल

अभिता ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. चा बियाणे विभाग आधुनिक नाविन्यपूर्ण शेतीत क्रांती घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शेतकरी आणि कृषीपूरक  व्यवसायांना उच्च प्रतीचे बी-बियाणे उपलब्ध करून देणे, हे आमचे प्रमुख ध्येय आहे. उत्कृष्ट बियाणे हा प्रत्येक पिकाचा मुख्य पाया असतो, यावर आमचा दृढ विश्वास आहे. त्यामुळेच आम्ही संशोधनावर आधारित नवनिर्मिती, उत्कृष्ट बियाणे उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणांचा पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, शाश्वत समृद्धी आणि शेतीमध्ये नफा मिळवणे सुलभ होते. 

अन्नधान्याची वाढती मागणी आणि हवामानात होणारे बदल, कीडरोग तसेच मर्यादित नैसर्गिक संसाधने यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी आमचे संशोधित बी-बियाणे सक्षम आहे. आमचा बियाणे विभाग अशा बियाण्यांच्या जाती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्या केवळ अधिक उत्पादन देत नाहीत, तर बदलत्या हवामानाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेतात.

 

प्रगत शेतीसाठी बियाण्यांचे महत्त्व 

शेती करीत असताना बियाणे म्हणजे केवळ पेरणीचे साधन नाही; तर ती यशस्वी पीक उत्पादनाची पायाभरणी असते. उच्च-कार्यक्षम, सर्वोत्कृष्ट बियाण्यांचा थेट प्रभाव पुढील बाबींवर होतो. 

  • पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता
  • कीडरोगांसाठी प्रतिकारशक्ती
  • वेगवेगळ्या हवामान क्षेत्रांशी जुळवून घेण्याची क्षमता
  • पाणी आणि खतांचा कार्यक्षम वापर

शेतकऱ्यांना जनुकीयदृष्ट्या उत्कृष्ट आणि प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देऊन, आम्ही अन्नसुरक्षा, शाश्वत शेती पद्धती आणि विविध प्रदेशांमध्ये कृषी समृद्धी वाढवण्यासाठी महत्वाचे योगदान देत आहोत.

आमचा दृष्टिकोन

आमचा बियाणे विभाग बियाणे विकास आणि सुलभ वितरणासाठी व्यापक, नाविन्यपूर्ण कृषी वैज्ञानिक आधारावर कार्यरत आहे. बियाणे निर्मितीत अत्याधिक संशोधन ते अंतिम पॅकेजिंगपर्यंतचा प्रत्येक टप्पा जबाबदारीने आणि अचूकतेने नियंत्रित केला आहे. आधुनिक शेतीसाठी निर्माण झालेल्या आव्हानांच्या सखोल विचार करूनच आमची कार्यप्रणाली आखली आहे. 

१. संशोधन आणि विकास 

अत्याधुनिक संशोधन आणि विकास या तत्वांना अनुसरून आमचा बियाणे विभाग कार्यरत आहे. येथे आमचे कृषी शास्त्रज्ञ आणि वनस्पती संशोधक नवीन बियाणे, उत्कृष्ट वाण विकसित करण्यासाठी अविरतपणे कार्य करीत आहेत. आमचा संशोधन कार्यक्रम पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करीत आहे. 

  • अत्याधिक उत्पन्न देणारे संकरित वाण 
  • हवामान बदलांना तोंड देणारी पिके 
  • कीडरोगांना प्रतिकारक्षम बियाणे 
  • दुष्काळ अवस्थेतही सहनशील 
  • पाण्याची कार्यक्षम बचत
  • उत्तम पौष्टिक गुणधर्म

आमच्या बियाणे निर्मिती कार्यक्रमात पुढील प्रमुख पिकांचा समावेश आहे. 

  • तृणधान्ये : मका, भात (तांदूळ)
  • कडधान्ये : सोयाबीन, तूर, हरभरा
  • फलोत्पादन : भाजीपाला आणि फळांच्या बिया (ग्राहकांच्या गरजेनुसार उपलब्ध)

विविध पिकांचे आमचे संशोधित वाण शेतकऱ्यांच्या गरजा आणि उद्योगाच्या मापदंडाची पूर्तता करतात. हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) संस्था आणि इतर संशोधन संस्थांसोबत नियमित कार्यरत आहोत. 

२. बियाणे उत्पादन

आमच्या नवीन संशोधित वाणाला मान्यता मिळाल्यानांतर आम्ही अभिता उद्योगाशी जोडल्या गेलेल्या करारातील शेतकऱ्यांसोबत आणि संबंधित शेती क्षेत्राची पाहणी करून भागीदारी करार करतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बियाणे उत्पादनाला सुरुवात होते. आमच्या उत्पादन पद्धतींमध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो. 

  • गुणवत्तेसाठी मूलभूत व संशोधित बियाण्यांचा वापर 
  • नियमित तपासणी, देखरेखीखाली लागवड
  • अनुवांशिक रोग टाळण्यासाठी योग्य विलगीकरण 
  • बियाण्यांची उगवण क्षमता टिकवून ठेवण्यासाठी वेळेवर काढणी

उत्कृष्ट बियाण्याची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आमची उत्पादन शेती क्षेत्रे निवडक कृषी-हवामान क्षेत्रांमध्ये विभागली आहेत.

३. बीज प्रक्रिया आणि पॅकेजिंग

उत्पादनाच्या काढणीनंतर आमच्या अत्याधुनिक बियाणे प्रक्रिया युनिट्समध्ये बियाण्यांवर सुक्ष्म प्रक्रिया केली जाते. त्यासाठी आमच्याकडे खालील अत्याधुनिक संसाधने व उपकरणे उपलब्ध आहेत. 

  • बियाणे स्वच्छतेसाठी क्लीनर व ग्रेडर 
  • ग्रॅव्हिटी सेपरेटर्स 
  • सीड कोटर्स व पॉलिशर 
  • आर्द्रता नियंत्रित ठेवणारे युनिट्स 

यामुळे केवळ सक्षम आणि आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बियाण्यांची निवड सुनिश्चित केली वाजते. त्यानंतर आम्ही हे संशोधित बियाणे आर्द्रता नियंत्रित, विना मानवी हाताळणी आणि कीटक प्रतिरोधक पिशव्यांमध्ये पॅक करतो. यामुळे बियाणांची दीर्घकाळ टिकवण क्षमता आणि वाहतुकीदरम्यान अखंडता सुनिश्चित होते.

शेतकरी, सहकारी संस्था आणि कृषी-निविष्ठा वितरकांना सोयीस्कर होईल अशा किरकोळ आणि मोठ्या ऑर्डरसाठी आमच्याकडे योग्य पॅकेजिंग पर्याय उपलब्ध आहेत.

४. गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणीकरण 

आमच्याकडे असलेली गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा ISTA या आंतरराष्ट्रीय बियाणे चाचणी संघटनेने घालून दिलेल्या नियमांचे आणि भारतीय बियाणे मानकांचे काटेकोरपणे पालन करते. त्यामुळे पुढील बाबी साध्य करता येतात. 

  • उगवण दर मानकांनुसार किंवा त्याहून अधिक आहे.
  • शुद्धता आणि आर्द्रता पातळी निर्धारित मर्यादेत आहे.
  • बियाण्याची आरोग्य स्थिती तपासली जाते आणि ती रोगजनकांपासून मुक्त असते.
  • बियाण्यांवर सुरक्षितपणे आणि एकात्मिकरित्या केलेली प्रक्रिया योग्य आहे.

बियाण्यांच्या सर्व बॅचला अधिकृत सरकारी संस्थांकडून प्रमाणित केले जाते. प्रत्येक बॅचला ट्रेसिबिलिटीसाठी बॅच क्रमांक दिलेला असतो. प्रत्येक पॅकेजसोबत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तांत्रिक माहिती, मार्गदर्शन आणि सल्ला या बाबी उपलब्ध असतात.

५. बियाणे वितरण आणि शेतकऱ्यांचा सहभाग

आमच्या मजबूत वितरण साखळीमुळे संशोधित उत्कृष्ट बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर आणि उत्तम स्थितीत पोहोचवले जाते. आमचा मार्केटिंग विभाग व ठिकठिकाणचे कर्मचारी या वितरण साखळीत नियमित सक्रिय आहेत. 

  • शेतकरी आणि स्वयंसहायता गट
  • कृषी विस्तार अधिकारी
  • कृषी निविष्ठा विक्रेते आणि सहकारी संस्था

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही गावोगावी क्षेत्रीय पीक प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियमित आयोजन करतो. यामागे आमची पुढील उद्दिष्टे आहेत. 

  • प्रगत कृषी पद्धती समजावून सांगणे 
  • बियाणे वाणानुसार निविष्ठांचा वापर व्हावा
  •  शेती खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ व्हावी 

शाश्वत शेती आणि अन्नसुरक्षा

 अभिता ॲग्रोमध्ये आमचा बियाणे विभाग हवामान पूरक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जगभरात होत असलेल्या प्रयत्नांचे समर्थन करतो. पाण्याचा ताण सहन करू शकणारे आणि शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील असे संशोधित बियाणे विकसित करून, आम्ही शेतकऱ्यांना पुढील बाबींमध्ये सहकार्य करतो. 

  • अनियमित पाऊस आणि तापमानातील बदलांशी जुळवून घेता यावे
  • रासायनिक कीटकनाशके आणि खतांवरील अवलंबित्व कमी व्हावे 
  • दुष्काळ सहन करू शकणाऱ्या वाणांद्वारे पाण्याची बचत व्हावी 
  • प्रतिएकर उत्पादनात वाढ व शेतकऱ्यांना पिकांचा उत्तम परतावा 

आम्ही केवळ संशोधित बियाण्यांद्वारेच नव्हे, तर ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान आणि परस्पर विश्वासाने शेतकऱ्यांना प्रगतीकडे नेण्याचे ध्येयधोरण अवलंबिले आहे.

 

Seed Image 1
Seed Image 2
Seed Image 3
Seed Image 4
Seed Image 5
Seed Image 6
Seed Image 7
Seed Image 8
Seed Image 9
Seed Image 8
Seed Image 8
Seed Image 8

मदतीसाठी हवे?

फॉर्म भरण्याऐवजी माणसाशी बोला? आमच्या कॉर्पोरेट ऑफिसवर कॉल करा आणि आम्ही तुम्हाला टीम सदस्याशी जोडू.

8655869400

info@abhitaagroindustries.com

संपर्क करा